पिंपरी : चिंचवडगाव येथील वेताळनगर येथील झोपडपट्टी पुर्नवसन प्रकल्पामध्ये मंजूर झालेल्या सदनिकांपैकी केवळ 1 हजार 8 सदनिकांचेच वाटप करण्यात आले असून उर्वरीत सदनिकांचे लवकरात लवकर वाटप करावे, अशी मागणी सी. आर. सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, वेताळनगर झोपडपट्टी पुर्नवसन प्रकल्पातील 560 सदनिकांचे वाटप अद्याप रखडले आहे. या सदनिका केव्हा तयार होतील व त्याचे वाटप केव्हा करण्यात येणार आहेत? याची माहिती देवून या सदनिका लवकरात लवकर वाटप कराव्यात, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर संघटनेचे युवक अध्यक्ष विनायक कुचेकर यांची स्वाक्षरी आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0