ताराबाई मुथा कन्या प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

पिंपरी – चिंचवड येथील ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे पारितोषिक वितरण व स्नेह संमेलन उत्साहात पार पाडले. नवकार महामंत्र, दीपप्रज्ज्वलन, ईशस्तवनने कार्यक्रमाची सुरूवात झाली. अध्यक्षस्थानी संस्थेचे सरचिटणीस ऍड. राजेंद्र मुथा होते. पुणे विद्यापीठाच्या व्याख्यात्या डॉ. अंजली क्षीरसागर, विश्‍वस्त आनंदराम धोका, डॉ. अशोक पगारिया, संस्थेचे सचिव राजेश सांकला आदी उपस्थित होते.

प्राचार्या एस. आर. जैन यांनी वार्षिक अहवाल सादर केला. यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्ती, कोळी गीत तसेच विविध नृत्याविष्कार सादर केले. डॉ. अंजली क्षीरसागर म्हणाल्या की, सध्याच्या विज्ञान, तंत्रज्ञानाच्या युगात मॉडेलिंग आणि सिम्युलेशन महत्त्वाचे आहे.

कॉम्प्युटेशनल मॉडेलिंग करणे गरजेचे आहे. भारतीय संस्कृतीमध्ये महिलांचे स्थापन महत्त्वाचे असून घर व नोकरी दोन्ही सांभाळण्यासाठी शरीर तंदुरुस्त ठेवा, असे आवाहन त्यांनी केले. सारंगा भारती, कल्पना गोरडे, सविता होनराव, स्वाती नेवाळे यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक एस. जी. देवकाते यांनी आभार मानले. मनिषा कलशेट्टी व वैशाली चुंगे यांनी आभार मानले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)