वर्कशॉप फोडून 70 हजारांचा ऐवज पळवला

पिंपरी – वर्कशॉपचा कडी-कोयंडा तोडून वर्कशॉपमधील 70 हजार रुपयाचे साहित्य चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना मोशी प्राधिकरण येथील सेक्‍टर नं. 6 येथे दि. 22 मे ते 24 मे दरम्यान घडली. याप्रकरणी शरद गोविंद सुर्यवंशी (वय-39) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मोशी प्राधिकरण येथील सेक्‍टर नं. 6 येथे वर्कशॉप आहे. दि. 22 मे रोजी ते वर्कशॉप बंद करुन बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या वर्कशॉपचे कडी-कोयंडा तोडून आतमधील टूल-बॉक्‍स, हॅंड ड्रिल मशिन, लॅपटॉप व मोबाईल असा 70 हजार रुपयाचा ऐवज चोरुन नेला. दि. 24 मे रोजी सूर्यवंशी वर्कशॉपवर परत आल्यानंतर प्रकार समोर आला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.