पिंपरी : बुद्ध गया येथील महाबोधी बुद्ध विहार मुक्तीसाठी येत्या मंगळवारी (दि.18) वडगाव मावळ येथे समस्त बौद्धजन बांधवांच्या वतीने मोर्चा आयोजित केलेला आहे. या मोर्चात सहभागी होऊन, या आंदोलनाला ताकद द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
बुद्ध गया येथील महाबोधी बुद्ध विहार मुक्तीसाठी देशभरात आंदोलन सुरू असुन या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मंगळवारी (दि. 18) दुपारी 1 वा वडगाव मावळ येथे समस्त बौद्धजन समाजाचा पक्ष विरहीत मोर्चा आयोजित केलेला आहे. मिलिंदनगर ते वडगाव तहसील कार्यालय असा मोर्चाचा मार्ग असणार आहे.