कामशेत : सह्याद्री विद्यार्थी अकादमी मावळ व पुणे काईट्स यांच्या संयुक्त विद्यमानाने कामशेत येथे प्रथमच पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या महोत्सवात लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांनी देखील पतंग उडविण्याचा आनंद घेतला. पिंपरी चिंचवड येथील मूक बधिर संस्था यांनी देखील यात सहभाग घेतला होतो.
यावेळी आकाशात उडविण्यात आलेल्या मोठ्या आकाराच्या पतंगांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये विठ्ठल स्वरूप पतंग, श्रीराम स्वरूप पंतग, तिरंगा पतंग, ड्रॅगन पतंग, हल्क पतंग असे विविध पतंग होते. यावेळी एका दोरीमध्ये १०० पतंग उडविण्यात आले, हे पाहून ग्रामस्थ चांगलेच प्रभावित झाले.
या महोत्सवात ७५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. विजेत्या स्पर्धकांना मोहन वाघमारे यांच्या सौजन्याने बक्षीस देण्यात आले. पुणे काईट्सचे प्रशिक्षक रमेश पार्टे, श्रीकांत चेपे, अतिष थोरात यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लक्ष्मण शेलार यांनी केले.