मावळ : वडगाव मावळ येथील रहिवासी शिवम संदीप बाफना यांच्या शुक्रवारी (दि.१४) तारखेला होणाऱ्या जैन भगवती दीक्षा महोत्सवापूर्वी युवाचार्य परमपूज्य श्री महेंद्र ऋषीजी म.सा. यांच्यासह अनेक जैन साधु व साध्वीजींच्या प्रमुख उपस्थितीत शिवम बाफना यांचा कुंकुम समारंभ संपन्न झाला.
अनेक मंगल कार्याच्या शुभारंभ प्रसंगी कुंकुम समारंभ संपन्न होत असतो. गावातील जैन समाजातील पंच मंडळी आणि उपस्थीत मान्यवर यांच्या माध्यमातून हा विधी पूर्ण केला जातो आणि प्रभावनेचे वाटप केले जाते
या विधीनंतर दिक्षार्थी शिवम बाफना यांची शैक्षणिक साहित्याने तुला करण्यात आली आणि हे साहित्य गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. महिला संगीत मंडळ यांचे मार्फत भावा हा धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला. या सोहळ्यासाठी महेंद्र ऋषीजी महाराज यांच्यासह सुमारे १०० जैन साधू व साध्वीजींचे मंगळवारी वडगाव मध्ये आगमन झाले आहे.
उद्या वरघोडाचे नियोजन असून वडगांव च्या प्रमुख रस्त्यांवर ही मिरवणूक निघणार आहे. पवित्र मंगलपाठ नंतर कार्यक्रमाची सांगता झाली. जैन स्थानकवासी श्रावक संघ, युथ ग्रुप, महिला मंडळ, पाठशाळा ग्रुप आदींनी नियोजन केले.