पिंपरी : सध्या महिलांमध्ये वाढत असलेल्या कर्करोगाचा प्रमाण लक्षात घेत संस्कार प्रतिष्ठान, लाइफ पॉइंट हॉस्पिटल वाकड आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ पुणे गट यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शन शिबिर कामगार कल्याण केंद्र उद्योग नगर चिंचवड येथे आयोजित केले होते.
या कार्यक्रमांमध्ये कॅन्सर तज्ञ डॉक्टर जयपाल रेड्डी यांनी बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार आणि त्यावर उपाय होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले. डॉक्टर मृणाल फोंडेकर यांनी आहार विषयी मार्गदर्शन केले. कामगार कल्याण केंद्रप्रमुख प्रदीप बोरसे यांनी कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजनांची माहिती दिली.
या कार्यक्रमाचे संयोजन संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मोहन गायकवाड आणि कामगार कल्याण केंद्रप्रमुख प्रदीप बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद पाथरे, नम्रता बांदल, प्रिया पुजारी, सायली सुर्वे, संध्या स्वामी, सुनंदा निकरड, रंजना जोशी, सुनिता गायकवाड, जयवंत सूर्यवंशी, मोहिनी, अश्विनी दहीतुले सूर्यवंशी, मीनाक्षी मेरुकर, रोहित मोरे, आनंद पुजारी, श्वेता मोरे, जयेंद्र मुरूमकर यांनी केले होते.