पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) – आंब्यांचा राजा म्हणून ओळखला जाणारा देवगड हापूस आंबा यंदाही आपल्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज झाला आहे. दरवर्षीप्रमाणे या देवगड हापुसची खास चव चाखण्यासाठी सुरुवात झाली असून आंबाप्रेमींसाठी ही पर्वणीच म्हणावी लागेल. मात्र, या आब्यांचे भाव सध्या गगनाला भिडलेले असून आवक वाढल्यानंतर त्याच्या किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता आहे.
देवगड हापूस आंबा हा त्याच्या केशरी रंगाच्या आकर्षक रूपासाठी आणि नैसर्गिक गोडव्यामुळे प्रसिद्ध आहे. पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना आता व्यापारी घरबसल्या आंब्याच्या पेट्या पोहचवत असून अगदी मुंबई आणि पुणे शहरांमध्ये दोन डझन किंवा त्याहून अधिक आंब्यांच्या ऑर्डरवर फ्री होम डिलिव्हरीकाही व्यापाऱ्यांकडून दिली जाणार आहे.
हापूसची चव काही वेगळीच असते. त्यामुळे शहरातील अनेक कुटुंबे या हंगामाची आतुरतेने वाट पाहत होती. मात्र, सध्या हापुस आंब्याची आवक कमी असल्याने दर जास्त आहेत. त्यामुळे नागरिकांकडून पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याचे व्यापारी सांगत आहेत.
आंब्याचे वजनानुसार दर
200 ते 250 ग्रॅम वजनाचा आंबा – 1800 रुपये प्रति डझन
170 ते 200 ग्रॅम वजनाचा आंबा – 1600 रुपये प्रति डझन
150 ते 170 ग्रॅम वजनाचा आंबा – 1300 रुपये प्रति डझन