वडगाव मावळ : पुणे जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी निर्भय महाराष्ट्र पार्टी – पुणे जिल्हा तर्फे विविध पोलिस ठाण्यांना भेट देण्यात आली. या भेटीत शाळा आणि कॉलेज परिसरात गस्त वाढवण्यासह सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
काल देहूरोड, वडगाव, कामशेत, तळेगाव दाभाडे, परंदवाडी आणि लोणावळा पोलिस ठाण्यांना भेट देऊन पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासंदर्भात मागण्या मांडण्यात आल्या.
या वेळी मावळ तालुका अध्यक्ष अनुप भेगडे, पिंपरी-चिंचवड जिल्हाध्यक्ष संग्राम पाटील, महाराष्ट्र सल्लागार अॅड. संपतराव फड, पुणे जिल्हा आयटी सेल प्रमुख मनोहर गवळे – माळी, किसन नागपाल आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
निर्भय महाराष्ट्र पार्टीने पोलिस प्रशासनासोबत समन्वय साधून तरुणांमध्ये वाढणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.