पिंपरी : मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा देहूगाव व रूक्षदायी प्रतिष्ठान यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी खासदार बारणे यांच्यासह श्री तीर्थक्षेत्र देहू संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, हभप माणिक महाराज मोरे, पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त शिवाजी महाराज मोरे, देहूगाव शिवसेना शहरप्रमुख सुनिल हगवणे, हभप जालिंदर महाराज मोरे, माजी नगरसेवक गणेश हगवणे, देहूगावचे भाजप शहराध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल,
माजी उपसरपंच सचिन साळुंखे, शिवसेना महिला मावळ तालुका प्रमुख शुभांगी काळंगे, शिवसेना शहर संघटिका शितल पवार, माजी उपसरपंच संतोष हगवणे व नागरिक यावेळी उपस्थित होते.