पिंपरी – ‘माझ्या गर्लफ्रेंडला का मारले’, असे म्हणून तरुणीच्या घरामध्ये घुसून तिचा विनयभंग केल्याची घटना दि. 26 जुलै रोजी धावडे वस्ती येथे घडली. याप्रकरणी पीडित तरुणीने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन, श्रीकांत नावाच्या एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी घरी असताना आरोपीने तिच्या घरामध्ये जबरदस्ती प्रवेश केला व त्याच्या गर्लफ्रेंडला का मारले असे विचारत तिचा विनयभंग केला. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर भोसरी एमआयडीसी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.