लोखंडी सुरा बाळगणाऱ्याला अटक

पिंपरी -लोखंडी सुरा बाळगणाऱ्या 19 वर्षीय तरुणाला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पोलिसांनी शनिवारी (दि.20) मोशी येथे केली. कुणाल प्रकाश कांबळे (वय-19रा. मोशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना संबंधित तरुणाबद्दल माहिती मिळाली होती, त्यानुसार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन तपास केला असता त्याच्याजवळ 6 इंच लांबीचा लोखंडी सुरा सापडला. त्यावरून एमआयडीसी भोसरी पोलिसांनी आर्म्स ऍक्‍टनुसार तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.