पिंपरी -पत्नीच्याच पगारातील पैसे मागणाऱ्या व न दिल्यास मारहाण व शिवीगाळ करणाऱ्या पतीविरुद्ध चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पत्नीने फिर्याद दिली असून संदीप तुकाराम उदमले (वय-50 रा.शिवणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने बेकायदेशीररीत्या दुसरा विवाह केला होता. खर्चासाठी तो आपल्या पहिल्या पत्नीच्या पगारातून काही रक्कमेची मागणी करत होता. पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने पत्नीला मारहाण व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वारंवार होत असलेल्या या प्रकारामुळे वैतागून विवाहितेने चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. चिंचवड पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल केला आहे.