पिंपरी – रिक्षा घेण्यासाठी व दारू पिण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन यावेत, यासाठी नवऱ्याने आपल्या बायकोचा छळ केल्याचा प्रकार चिखली येथे घडला आहे. याप्रकरणी 29 वर्षीय विवाहितेने आपल्या पतीविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी पती सुहास सुरेश बोराटे (वय-31) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचा 2014 साली आरोपीशी विवाह झाला. त्यानंतर सुहासने आपल्या पत्नीकडे पैशांची मागणी सुरू केली. तुझ्या वडिलांकडून रिक्षासाठी व दारूसाठी पैसे घेऊन ये असा तगादा लावला. पैसे आणले नाही म्हणून मारहाण व शिवीगाळ केली.