कारची काच फोडून सहा तोळे सोने चोरले

पिंपरी -कारची काच फोडून कार मधून सहा तोळे चोरीला गेल्याची घटना चिंचवड येथे शनिवारी (दि.23) घडली. याप्रकरणी इमरान अब्दुल रहमान चौधरी (वय-31 रा.चिखली) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमरान यांची टोयोटा कार (एमएच 06 एझेड4774) ही लॉक करून चिचंवड येथील शुभम गार्डजनच्या आतील बाजूस रसत्याच्या कडेला उभी होती. यावेळी शनिवारी रात्री साडे आठ ते अकरा या कालावधीत अज्ञात चोरट्याने गाडीची मागील काच फोडून आतील 2 लाख 29 हजार रुपये किंमतीचे 64.15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने चोरून नेले. याप्रकरणी चिंचवड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.