पिंपरी (प्रतिनिधी) – सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात शनिवारी (दि. 6) आणखी दोन करोना बाधित रुग्णांची भर पडली. औंध-आंबेडकर वसाहत येथील 60 वर्षीय पुरुष आणि नाना पेठ (पुणे) येथील 72 वर्षीय महिलेचा त्यामध्ये समावेश आहे.
त्यामुळे करोना बाधित रुग्णांचा आकडा 147 पर्यंत जाऊन पोहचला आहे. रुग्णालयामध्ये आज 8 संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. 36 रुग्ण आत्तापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. त्यांना घरी सोडले आहे. सध्या 26 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 9 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 73 जणांना अन्य रुग्णालयात हलविले आहे. तर, 12 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.