पिंपरी – करोना मृतांची संख्या घटली

दिलासादायक : 716 बाधित, 1019 करोनामुक्त, 46 रुग्णांचा मृत्यू

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात गेल्या पाच दिवसांपासून करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यासोबतच आता मृतांची संख्याही घटू लागली आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. आज शहरात 1019 रुग्ण करोनामुक्त झाले. तर 716 नवीन बाधितांची भर पडली आहे. तसेच 46 रुग्णांच्या मृत्यूची आज नोंद झाली आहे.

महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, गुरुवारी (दि. 20) शहरात 716 जणांना करोनाची लागण झाली. तर शहराबाहेरील रुग्णांची आकडेवारी पालिका प्रशासनाने प्रसिद्ध केली नाही. आजपर्यंत शहरातील 2 लाख 44 हजार 663 जणांना करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात 46 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामध्ये शहरातील 29 व शहराबाहेरील 17 जणांचा समावेश आहे. आजपर्यंत शहरातील व शहराबाहेरील 5753 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

आज दिवसभरामध्ये 1099 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 27 हजार 498 इतकी झाली आहे. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 4566 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 8795 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 13 हजार 361 इतकी आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.