पिंपरी-चिंचवडकरांना हवाय विकास करणारा खासदार..!

सिटीझन फोरमचा जाहीरनामा प्रसिद्ध

आकुर्डी –
येत्या लोकसभा निवडणुकीत जाती-पातीवर राजकारण करणाऱ्या नेत्यांना नाही तर, विकासाचे राजकारण करणाऱ्या उमेदवारालाच निवडूण देण्यासाठी पिंपरी-चिंचवडकरांनी आपला जाहीरनामा तयार केला असून शनिवारी तो प्रसिद्ध करण्यात आला. जाहिरनाम्यातील अटीनुसार शहराचा विकास करणाऱ्याच उमेदवाराला सहकार्य करण्याचा निर्णयही यावेळी जाहीर करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षांनी आपाला जाहीरनामा प्रसिद्ध करुन आपण निवडूण आल्यावर कुठल्या गोष्टींना प्राधान्य देवू हे स्पष्ट केले असतांनाच पिंपरी-चिंचवडच्या सिटीझन फोरमच्या सभासदांनी शहर विकासाचा जाहिरनामा तयार करून तो प्रसिद्ध केला आहे. या जाहिरनाम्यातील जास्तीत-जास्त गोष्टी ज्या पक्षाला मान्य असतील त्यांनाच येत्या निवडणुकीत निवडूण देण्यात येईल, असे फोरमच्या वतीने पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करण्यात आले आहे.

या जाहिरनाम्यात मुख्यत्वे शहरातील नागरी सुविधा केंद्र, आपले सरकार आणि नागरीक सेवा केंद्र यांना एकमेकांना जोडने, शहरातील परिवहन व्यवस्था एकमेकांना पुरक करणे, इन्होव्हेशन हब, स्मार्ट पोलिसिंग, नद्यांना स्वच्छ करणे, क्रीडा क्षेत्रांना चालना देणे, शहराचा सांस्कृतीक वारसा जपणे, प्रशासनात तंत्रज्ञाननचा वापर करणे, देशी प्रजातींचे कायमस्वरुपी 33 टक्के हरित अच्छादन करणे, शहर संरचना व नियोजन करणे आदी मुद्दयांवर भर देण्यात आला आहे. हा जाहीरनामा तयार करताना शहरातील सर्वच भागातील नागरिकांनी यात आपले मुद्दे आणि समस्या मांडल्या आहेत. यामुळे हा जाहीरनामा मान्य असणाऱ्या पक्षाला व उमेदवारांनाच यावेळी मत दिले जाणार असल्याने सिटीझन फोरमच्या पदाधिकारी व सदस्यांनी स्पष्ट केले. जाहीरनाम्याच्या प्रती ह्या निवडणूक लढत असणाऱ्या उमेदवारांना प्रत्यक्ष भेटून दिल्या जाणार आहेत. तर नागरिकांपर्यंत सोशल मिडीयाच्या माध्यमातून पोहोविणार असल्याचे फोरमचे मुख्य समन्वयक तुषार शिंदे, समन्वयक अमोल देशपांडे, बिल्वा देव यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)