पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाचे रुग्ण गेल्या दोन दिवसांपासून वाढत होते. मात्र आज (दि. 13) पुन्हा घटले आहेत. 24 तासांत अवघ्या 98 नव्या रुग्णांची भर पडल्याने बाधितांचा आकडा 89 हजार 381 इतका झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 3 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
गुरुवारी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांचा अहवाल आज (शुक्रवारी) महापालिकेला प्राप्त झाला. आजच्या अहवालानुसार शहरातील 98 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर गेल्या 24 तासांत 3 जणांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये शहरातील एकाचा तर शहराबाहेरील दोघांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील मृतांचा आकडा 1559 वर पोहोचला असून, शहराबाहेरील 645 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याने मृत्यूच्या आकड्याने 2204 ची संख्या आज गाठली.
गेल्या 24 तासांत मृत्यू झालेल्यांमध्ये शहरातील दिघी येथील एकाचा समावेश असून, शहराबाहेरील सोलापूर आणि आळंदी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.