निगडी – श्री जैन विद्या प्रसारक मंडळ, चिंचवड संचालित सौ. ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशालेत दहावीची पुरवणी परीक्षेस सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग, पुणे यांच्या वतीने आयोजित केलेल्या एस. एस. सी. बोर्ड पुरवणी परीक्षा घेण्यात येत आहे. ही परीक्षा शासन आदेशानुसार कोविड-19 च्या अनुषंगाने दिलेल्या सूचनांचे पालन करत परीक्षा घेण्यात येत आहे.
दोन विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यात आले आहे. दोन परीक्षार्थींमध्ये एक बॅंच मोकळी ठेवण्यात आली आहे. तसेच नियमांचे पालन करून परीक्षा घेण्यात येत आहे. 5 डिसेंबरपर्यंत ह्या परीक्षा घेण्यात येणार आहेत.
केंद्रसंचालक प्राचार्या सी. एन. बोरा, उपकेंद्रसंचालक पर्यवेक्षिका एस. एस. भारती यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ह्या परीक्षा घेण्यात येत आहेत.