पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील श्री मोरया गोसावी समाधी मंदिर हे अंगारकी चतुर्थीनिमित्त करोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे.
मंदिर परिसरात जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मंदीराकडे जाणारा रस्ता बॅरिकेट्स लावून बंद केला आहे. त्यामुळे भाविक रस्त्यावरूनच भाविक दर्शन घेत आहेत. नागरिकांनी मंदिर परिसर किंवा दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन चिंचवड पोलीस ठाण्याचे निरीक्षक विश्वजित खुळे यांनी केले आहे.