पिंपरी – पिंपरी-चिंचवडच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील चार मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या नुकत्याच झाल्या होत्या. या बदल्यांमध्ये आणखी एकाची भर पडली आहे. कार्यालतील बदली होणाऱ्या मोटार वाहन निरीक्षकांची संख्या आता पाच झाली आहे.
तीन दिवसांपूर्वी चार मोटार वाहन निरिक्षकांची बदली इतर ठिकाणी करण्यात आली होती. त्यापाठोपाठ परिवहन आयुक्तालयाकडून आणखी एका मोटार वाहन निरिक्षकाची बदली करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड येथील उपप्रादेशिक कार्यालयात कार्यरत असलेल्या शितल प्रकाश पवार यांची बदली पुणे येथील आरटीओ कार्यालयात करण्यात आली आहे.
तर, पुण्यात कार्यरत असलेले मोटार वाहन निरिक्षक रविकिरण भड, नांदेड येथील साधना दुधमले तर,श्रीरामपूर येथूल आयेशा हूसेन यांची बदली पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयात करण्यात आली आहे. या बदल्या तात्काळ करण्यात आल्या असून संबधित मोटार वाहन निरिक्षकांनी तात्काळ बदली झालेल्या कार्यालयात पदभार स्विकारण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.