पिंपरी-चिंचवड : बदल्यांच्या प्रक्रियेत पोलीस आयुक्‍तालय फायद्यात

पाच अधिकारी गेले, 19 अधिकारी मिळाले

पिंपरी – अत्यल्प मनुष्यबळाच्या समस्येशी झुंज असलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला यावेळी झालेल्या बदल्यांचा मोठा फायदा झाला आहे. निवडणुकानंतर राज्यभरातल्या अधिकाऱ्यांच्या बदली प्रक्रियेमध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयातील पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या, त्याबदल्यात 19 अधिकाऱ्यांना पिंपरी-चिंचवडमध्ये नियुक्‍ती मिळाली आहे. त्यामुळे, प्रमुख अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांवर असलेला कामांचा ताण काही प्रमाणात का होईना कमी होणार आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. या बदल्याचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) राजेश प्रधान यांनी आदेश काढले आहे. या बदल्यामध्ये पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील दोन पोलीस निरीक्षक, एक सहायक पोलीस निरीक्षक व दोन पोलीस उपनिरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. तर, त्याबदल्यात पिंपरी-चिंचवडसाठी पाच पोलीस निरीक्षक, दहा सहायक पोलीस निरीक्षक व चार पोलीस उपनिरीक्षक असे 19 अधिकारी बदलीवर आले आहेत.

पिंपरी चिंचवड आयुक्तालयातून बदली झालेले अधिकारी

पोलीस निरीक्षक नवनाथ घोगरे (कोल्हापूर), पोलीस निरीक्षक नितीन जाधव (खंडाळा पोलिस प्रशिक्षण केंद्र), सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया भोईटे (पोलिस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा), पोलीस उपनिरीक्षक संभाजी पाटील (अमरावती शहर), पोलीस उपनिरीक्षक सचिन राऊळ (औरंगाबाद परिक्षेत्र) यांची बदली झाली आहे.

नव्याने आलेले पोलीस अधिकारी

या बदली प्रक्रियेमध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात नानविज प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षक राजकुमार शिंदे , पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड (कारागृह विभाग), पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), पोलीस निरीक्षक शंकर बाबर (मुंबई शहर), पोलीस निरीक्षक सुनील टोणपे (खंडाळा पोलिस प्रशिक्षण केंद्र) तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गरुड, सिद्धेश्वर कैलासे (विशेष सुरक्षा विभाग), राजू चव्हाण, कृष्णचंद्र शिंदे, विजय बहीर (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), अविनाश पवार (मुंबई शहर), स्वाती खेडेकर (मुंबई शहर), सुधीर चव्हाण (नांदेड), विनोद पाटील (दहशतवाद विरोधी पथक, मुंबई), चंद्रशेखर चौरे (गोंदिया) तसेच पोलिस उपनिरीक्षक सचिन शिंदे (ठाणे शहर), यतीन संकपाळ (दहशतवाद विरोधी पथक), रामदास जाधव व अवधूत शिंगारे (गडचिरोली) या 19 अधिकाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.