Pimpri | राष्ट्रीय ग्रॅपलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत पिंपरी-चिंचवडचे खेळाडू चमकले

पिंपरी, – 17 व्या राष्ट्रीय ग्रॅपलिंग चॅम्पियनशिप स्पर्धा जम्मू युनिव्हर्सिटी, जम्मू येथे आयोजित करण्यात आल होती. या स्पर्धेत महाराष्ट्रातून 52 खेळाडू, 07 रेफरी, 06 कोचेस व 03 ऑफिशियल्स यांनी सहभाग घेतला. त्यात पिंपरी चिंचवडचे 19 खेळाडू होते या स्पर्धेत टीम चॅम्पियनशिपमध्ये हरियाणा प्रथम, महाराष्ट्र द्वितीय आणि मध्य प्रदेश तृतीय ठरले.
महाराष्ट्रातून तथा पिंपरी चिंचवड मधून स्नेहल पवार, ऋतिका वाघमारे, यांनी राष्ट्रीय रेफरी म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली. तसेच, महाराष्ट्राचे कोच म्हणून रवि गायकवाड (उपाध्यक्ष), नरेश मेहेत्रे संजय खाडे आणि पल्लवी पाटील यांनी उत्तम मार्गदर्शन केले. या सर्व विजयी खेळाडूंना व संघाला महाराष्ट्र राज्याचे सचिव संतोष देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले, तसेच पिंपरी चिंचवड ग्रॅपलिंग संघटनेचे अध्यक्ष स्नेहल पवार यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक केले. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने 43 सुवर्णपदके, 32 रौप्यपदके आणि 24 कास्यपदके मिळवून अप्रतिम कामगिरी केली.
या खेळाडूंनी केली चमकदार कामगिरी
राज जाधव – 2 सुवर्णपदक, शर्वरी हंकारे – 2 सुवर्णपदक, आर्या म्हस्के -2 सुवर्णपदक, ऐश्वर्या क्षीरसागर – 2 सुवर्णपदक, स्वपनाली सुरवसे – सुवर्णपदक व कांस्य पदक, कवीर करपे – 2 सुवर्णपदक, इशान बोंगाले – 2 सुवर्णपदक, त्विषा बडगुजर – सुवर्णपदक व रौप्यपदक, हर्षल देसले – 2 रौप्यपदक, अभिज्ञा पाटील – रौप्यपदक व कांस्य पदक, यश सुरवसे – रौप्यपदक व कांस्यपदक, आदर्श शिंदे – 2 कांस्यपदक, विराज शितोळे – कांस्यपदक, यज्ञा जाधव – कांस्यपदक, अंश जाधव – कांस्यपदक, निहिरा कुलकर्णी – कांस्यपदक





