पिंपरी चिंचवड : आठ किलोमीटर रस्त्यावर सांडले ऑईल

चिंचवड स्टेशन ते भूमकर चौक-वाकड दरम्यानची घटना

पिंपरी – कोणत्यातरी अज्ञात वाहनातून मोहन नगर, चिंचवड स्टेशन ते भुमकर चौक, वाकड या आठ किलोमीटरच्या रस्त्यावर ऑइल सांडले. संभाव्य अपघाताचा धोका लक्षात घेऊन अग्निशामक दलाचे तीन बंब सांडलेल्या ऑइलवर माती टाकण्याचे काम सकाळपासून करीत आहे. ही घटना रविवारी दि.१७) सकाळी सात वाजण्यापूर्वी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार मोहन नगर चिंचवड परिसरात रस्त्यावर ओईल सांडले असल्याची माहिती नागरिकांनी वाहतूक पोलिसांना दिली. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी याबाबत अग्निशामक दलास कळवले. ऑइल कुठपर्यंत चांगले आहे याची पाहणी केली असता चिंचवड स्टेशन ते भुमकर चौक दरम्यान मोठ्या प्रमाणात ऑइल सांडल्याचे दिसून आले. यामुळे पोलिसांच्या मदतीने अग्निशामक दलाने ऑइल असलेल्या भागातील रस्ता वाहतुकीकरिता बंद केला. रस्त्याच्या कडेला असलेली माती ऑइल असलेल्या ठिकाणी टाकली.

सध्या पिंपरी-चिंचवड अग्निशामक दलाचे तीन बंब या आठ किलोमीटरच्या रस्त्यावर ऑइल असलेल्या ठिकाणी माती टाकण्याचे काम करीत आहे. काही नागरिकही अग्निशामक दलाच्या मदतीला आले आहेत. आज रविवार असल्याने अनेक कंपन्यांना सुट्टी आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची वर्दळ इतर दिवसांपेक्षा कमी आहे. यामुळे या परिसरात मोठा अपघात घडला नाही. या मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन वाहतूक पोलीस आणि अग्निशामक दलाने केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.