240 नवीन रुग्णांची भर : 393 जणांना “डिस्चार्ज’
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज नवीन 240 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 9 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरामध्ये 92774 रुग्णांना करोनाची लागण झाली आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, बुधवारी दुपारी चार वाजेपर्यंत शहरातील 223 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील 17 रुग्णांची नोंद झाली. आज दिवसभरात 9 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 4 व शहराबाहेरील 5 रुग्णांचा समावेश आहे.
आजपर्यंत 2318 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील 1642 तर शहराबाहेरील 676 रुग्णांचा समावेश आहे. आज शहरातील चिंचवड, पिंपरी, चिखली, थेरगाव येथील चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर शहराबाहेरील खेड, सोलापूर, देहूगाव, जुन्नर, देहूरोड येथील पाच रुग्णांचा मृत्यू झाला.
आज दिवसभरात 393 रुग्णांना घऱी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 88972 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 4154 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यापैकी 991 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.