पिंपरी-चिंचवडमध्ये जमावबंदीवर पोलिसांचा ड्रोन कॅमेऱ्याद्वारे ‘वॉच’

पिंपरी – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश जारी दिले आहेत. नागरिकांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस शहरात प्रथमच ड्रोन कॅमेऱ्याद्वारे ‘वॉच’ ठेवणार आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरासह जगभरात कोरोना या साथीच्या आजाराने धुमाकूळ घातला आहे. या आजाराला रोखण्यासाठी बुधवारी (दि. १८) जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. मात्र, तरी काही ठिकाणी नागरिक गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे. बंदी असूनही दुकाने सुरू ठेवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

या पार्श्वभूमीवर रविवार (दि. २२) पासून शहरावर ‘ड्रोन कॅमेरा’ घिरट्या घालणार आहे. याचे थेट प्रक्षेपण स्थानिक पोलीस ठाण्यात होणार आहे. यामध्ये एखाद्या ठिकाणी गर्दी झाल्याचे दिसून आल्यास पोलीस तत्काळ त्या ठिकाणी जाऊन कारवाई करणार आहेत. असे चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.