पिंपरी – बस स्टॉपवर बसची वाट पाहत असलेल्या तरुणाला लुटल्याची घटना हिंजवडी येथील बस स्टॉपवर शनिवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी, गणेश बाळासाहेब मस्कर (वय 18, रा. आनंदपार्क लेन, थेरगाव, मुळ रा. पांढऱ्याचीवाडी ता.जि.बीड) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी रात्री एक वाजताच्या सुमारास गणेश हा हिंजवडी बस स्टॉपवर बसची वाट पाहत उभा होता. यावेळी एका रिक्षामधून आलेल्या दोघांनी गणेश यांच्या खिशातील 10 हजारांचा मोबाईल आणि रोख 550 रुपये जबरदस्तीने काढून घेत रिक्षामधून पळ काढला.