जबरदस्तीने लग्न करुन अत्याचार

पिंपरी – तरूणीला कॉलेजच्या प्रवेशद्वारावरून जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नातेवाईकांच्या घरी नेवून तिच्यावर अत्याचार केला, तसेच आळंदी येथे नेऊन बळजबरीने लग्न केले. फेसबुकवरून तिची बदनामी करून नातेवाईकांना शिवीगाळ केली. हा प्रकार वाकड येथे घडला. याप्रकरणी पीडित 21 वर्षीय तरूणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चंद्रशेखर भागवत केकाण (रा. खंडाळा, ता. बीड) व त्याचे इतर तीन मित्र या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सप्टेंबर 2016 मध्ये पीडित तरूणी कॉलेजमध्ये होती. यावेळी आरोपी चंद्रशेखर याने तिला कॉलेज प्रवेशद्वारावरून बळजबरीने दुचाकीवर बसण्यास भाग पाडले. त्यानंतर तिला वाल्हेकरवाडी येथील त्याच्या नातेवाईकाच्या घरी नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर बदनामी करण्याची व जिवे मारण्याची धमकी देत मित्रांच्या मदतीने मोटारीत बसवून आळंदी येथे नेले आणि जबरदस्तीने लग्न करून वारंवार बलात्कार केला. तसेच फेसबुकवर तिची बदनामी करून नातेवाईकांना शिवीगाळ केली.

Leave A Reply

Your email address will not be published.