पिंपरी-चिंचवड : सह शहर अभियंतापदी गट्‌टुवार यांना बढती

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता देवन्ना गट्‌टुवार यांना सह शहर अभियंतापदी बढती देण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी (दि. 1) झालेल्या विधी समितीच्या बैठकीत आयत्यावेळी मंजूर करण्यात आला. या प्रस्तावावर महासभेत शिक्कामोर्तब केले जाईल.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सह शहर अभियंत्याची (स्थापत्य) तीन पदे मंजूर आहेत. त्यापैकी एक पद मागासवर्गीयांसाठी
आरक्षीत आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने छोट्या संवर्गातील मागासवर्गीयांकरिता आरक्षीत पदे पदोन्नतीने पदे भरताना अनुसरावयाची कार्यपद्धती विहित केलेली आहे. त्यानुसार बिंदुनामावलीच्या क्रमवारीनुसार अनुसूचित जमाती प्रवर्गातील पद रिक्त आहे. बिंदुनामावलीनुसार या जागेवर सद्यस्थितीत अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या उमेदवारास पदोन्नती देणे आवश्‍यक आहे.

महापालिका आस्थापनेवरील कार्यकारी अभियंता (स्थापत्य) देवन्ना गट्‌टुवार हे सेवाज्येष्ठता यादीप्रमाणे प्रथम क्रमांकावर आहेत. त्यामुळे त्यांना सह शहर अभियंतापदी बढती देण्याचा सदस्य प्रस्ताव ऐनवेळी मंजूर करण्यात आला. त्याची महासभेकडे शिफारस करण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)