पिंपरी -पायी फिरण्यासाठी निघालेल्या एका वृध्देच्या गळ्यातील 50 हजार रुपये किंमतीचे दोन तोळे वजानाचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेले.
ही घटना शाहुनगर येथील हनुमान मंदिराजवळ घडली. याप्रकरणी अनिता राजगोंडा पाटील (वय 60, रा. शाहुनगर) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पल्सर दुचाकीवरील दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.