आपल्यावरच हसल्याच्या संशयातून वर्ग मित्राला बेदम मारहाण

पिंपरी -वर्गामध्ये आपल्यावरच हसल्याच्या संशयातून दोघांनी मिळून वर्ग मित्राला जबर मारहाण करुन जखमी केली. ही घटना शनिवारी (दि. 22) दुपारी वाकड येथे घडली. याप्रकरणी पिराजी धुरपत खंकरे (रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चेतन मोहोळकर, अमोल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिराजी आणि आरोपी हे एकाच वर्गात शिक्षण घेत आहेत. शनिवारी सकाळी वर्गामध्ये मुल हसत होती. यावेळी, पिराजी त्यांची टिंगल करुन सर्वांना त्यांच्यावर हसायला लावत आहे असा समज आरोपींचा झाला. त्यामुळे या दोघांनी मिळून पिराजी याला बेदम मारहाण करुन जखमी केले. या प्रकरणाचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.