दोन मोबाईल चोरटे जेरबंद

पिंपरी – ट्रकमध्ये झोपलेल्या चालकाला मारण्याची धमकी देवून त्याचा मोबाईल व ट्रकची चावी हिसकावणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 22 जून) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास बावधन येथील हॉटेल रंगीला पंजाब समोर घडली. विकास भाऊसाहेब लहासे (वय-19, रा. जगताप नगर, थेरगाव) व नागेश बाबू भंडारी (वय-19, रा. म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

याप्रकरणी ट्रक चालक पुरनचंद यादव (वय-29, रा. पतंगनगर, घाटकोपर) यांनी हिंजवडी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरनचंद यादव हे आपल्या ट्रकमधील कॅबीनमध्ये झोपलेले असताना पहाटेच्या सुमारास आरोपी तेथे आले व यादव यांना मारण्याची धमकी देवून त्यांच्या जवळील 2 हजार रुपये किंमतीचा मोबाईल व ट्रकची चावी घेवून पसार झाले. त्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.

Leave A Reply

Your email address will not be published.