वीस लाखांसाठी विवाहितेचा छळ

पिंपरी – लग्नात मानपान केले नाही तसेच माहेरहून 20 लाख रुपये आणले नाहीत म्हणून विवाहितेचा छळ केल्याची घटना रावेत येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पतीसह सासू, सासरे व नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीत 28 वर्षीय विवाहितेने देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गजानन रुक्‍माजी पेंढारकर (वय-34), मालन रुक्‍माजी पेंढारकर, रुक्‍माजी पेंढारकर व सत्यभामा बोळकेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचे लग्न झाल्यापासून आरोपींनी संगनमत करुन तुझ्या लग्नात साहित्य दिले नाही, पाहुणचार-मानपान केला नाही, माहेरहुन 20 लाख रुपये का आणले नाहीत असे म्हणून तिला मारहाण करुन शिवीगाळ केली. तसेच उपाशीपोटी ठेवून शारिरीक व मानसिक छळ केला. अधिक तपास देहुरोड पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.