पिंपरी -दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून एकाला खुर्चीने मारहाण करण्यात आली. ही घटना 20 जून रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास चिंचवड येथील पुर्णानगर परिसरातील शर्मा पावभाजी सेंटरजवळ घडली. याप्रकरणी सिध्दांत गोरख गुप्ता (वय- 36 रा. नक्षत्र फेज, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरुन प्रदीप सर्जद्याल गुप्ता (वय-38 रा. पुर्णानगर, चिंचवड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सिध्दांत यांनी आरोपी प्रदीप याला उसणे पैसे दिले होते. उसणे पैसे परत मागितल्याचा राग मनात धरुन त्याने फिर्यादी सिध्दांत यांना धक्काबुक्की केली व खुर्चीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.