जबरदस्तीने तरुणाचा मोबाईल पळविला

पिंपरी – रस्त्याने पायी चालत जात असलेल्या तरुणाचा मोबाईल फोन दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना बुधवारी (दि. 5) पहाटे वाल्हेकरवाडी येथे घडली.

या प्रकरणी पराग संजय गायकवाड (वय 21, रा. वाल्हेकरवाडी) या तरुणाने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात तीन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पराग बुधवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास वाल्हेकरवाडी मधील रस्त्याने पायी चालत जात होता. त्यावेळी, पांढऱ्या रंगाच्या ऍक्‍टिव्हा दुचाकीवरून तीनजण आले. त्यांनी परागच्या हातातून जबरदस्तीने दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन हिसकावून नेला. या प्रकरणाचा चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.