चिंचवड येथे शनिवारपासून डॉ. वसंतराव देशपांडे जन्मशताब्दी संगीत महोत्सव

पिंपरी -डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरियल फाउंडेशन आयोजित डॉ. वसंतराव देशपांडे जन्मशताब्दी संगीत महोत्सवाचे चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शनिवार (दि. 4) आणि रविवारी (दि. 5) आयोजन केले आहे, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष तथा कार्यकारी विश्‍वस्त डॉ. रवींद्र घांगुर्डे यांनी दिली.

महोत्सवाचे उद्‌घाटन शनिवारी (दि. 4) महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते होणार आहे. या संगीत महोत्सवात मान्यवर कलाकारांचे गायन, वादन आणि नृत्य सादर होणार आहे. रविवारी (दि. 5) युवा शास्त्रीय गायिका शरयू दाते यांना डॉ. वसंतराव देशपांडे युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. रोख 11 हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.