रेल्वे प्रवाशांच्या दिमतीला पुणे-वलसाड एक्‍सप्रेस

सुट्टीच्या हंगामात सुविधा : आठवड्यातून दोन दिवस धावणार गाडी

चिंचवड  – मध्य रेल्वेच्या वतीने सुट्टीच्या हंगामात पुणे-वलसाड-पुणे (ट्रेन क्रमांक 01395 अप) व येताना (01396 डाउन) नवीन एक्‍सप्रेस गाडी सुरू करण्यात आली. चिंचवड रेल्वे स्थानकात या गाडीचे स्वागत करण्यात आले.

चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते मनोहर जेठवाणी व चिंचवड रेल्वे स्थानक प्रमुख अनिल नायर, सहाय्यक स्थानक प्रमुख निळकंठ सूर्यवंशी यांच्या हस्ते इंजिनला पुष्पहार घालून गाडीचे स्वागत करण्यात आले.
चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, नारायण भोसले, मुकेश चुडासमा, नयन तन्ना, हार्दिक जानी, इक्‍बाल सय्यद, डी. घुले, नंदू भोगले, जॉनी फ्रान्सीस, अजित कंजवाणी, भगवानदार खत्री, किरण रामनानी, चंदू रामनानी, दीपक लोहाना, कैलास लोखवानी, मध्य रेल्वेचे चिंचवड स्थानक प्रमुख अनिल नायर, सुरेश साठे, प्रवीण जाधव, मनोज फोंडगे, सूरज आसदकर, रेल्वे इंजिन चालक रमेश दौंड, ओंकार कुमार यांना चिंचवड प्रवासी संघाचे नारायण भोसले, नयन तन्ना, किरण रौंदळ, नीरज भोसले आदी उपस्थित होते.

चिंचवड रेल्वे स्थानकाचे प्रमुख अनिल नायर म्हणाले, ही एक्‍सप्रेस गाडी आठवड्यातून दर मंगळवारी व गुरूवारी पुणे येथून पहाटे 5 वाजून 35 मिनिटांनी सुटून चिंचवड येथे 5 वाजून 53 मिनिटांनी येणार आहे. एक मिनिटांचा थांबा आहे. लोणावळा, कल्याण, भिवंडी रोड, वसई रोड, विरार, भोईसर, वापी या एक्‍सप्रेस गाडीचा थांबा असणार आहे. वलसाड येथे दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी पोहचणार आहे. वलसाड येथून त्याच दिवशी दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी सुटून या थांब्यांवर थांबा घेत परत चिंचवड येथे रात्री 8 वाजून 23 मिनिटांनी थांबेल व पुढे पुणे रेल्वे स्थानकावर रवाना होईल.
वलसाड हा दक्षिण गुजरात मधील एक जिल्हा आहे.

पिंपरी-चिंचवडमधील नागरीक सध्या सिंहगड एक्‍सप्रेसने दादर पर्यंत जातात. तेथे उतरून पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते विरार लोकलमधून पुढील प्रवास दादर येथून करावा लागतो. त्यांच्यासोबत सामान, महिला, ज्येष्ठ नागरिकांना मुंबईतील गर्दीला सामोरे जाण्याची वेळ येत होती. आता चिंचवड येथून भिवंडी रोड, वसई रोड, विरारपर्यंत जाण्यासाठी थेट प्रवासी सेवा मध्य रेल्वेने वलसाड या एक्‍सप्रेस गाडीद्वारे उपलब्ध करून दिल्यामुळे त्याची ससेहोलपट आता थांबणार आहे, अशी माहिती चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने यावेळी देण्यात आली.

अहिंसा एक्‍सप्रेसला चिंचवडमध्ये थांबा मिळावा

पिंपरी-चिंचवड शहरात जैन, गुजराती, मारवाडी समाजातील सुमारे दोन लाखाहून अधिक नागरिक वास्तव्यास आहे. तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील औद्योगिक क्षेत्रातील शेकडो व्यक्ती कामासाठी सुरत, अहमदाबाद येथे त्यांना वारंवार जावे लागते. त्यांच्या सोयीसाठी अहिंसा एक्‍सप्रेसला चिंचवड रेल्वे येथे थांबा मिळावा, अशी मागणी चिंचवड रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने यावेळी करण्यात आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.