पिंपरी-चिंचवड : अधिकारी दिव्यांग मतदारांच्या घरी

पिंपरी – चिंचवड विधानसभा मतदार संघातील दिव्यांग नागरिकांच्या घरोघरी भेट देवून दिव्यांग मतदारांना मतदानासाठी उपलब्ध सुविधांबाबची माहिती देण्यात आली. निवडणूक विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मतदान जनजागृती कक्षामार्फत स्वतः जाऊन माहिती देत आहेत. तसेच, मतदारसंघातील ज्या दिव्यांग नागरिकांचे अद्याप मतदार यादीत नाव नोंदविलेले नाही अशा मतदारांकडून संबंधित सेक्‍टर अधिकाऱ्यांमार्फत फॉर्म भरुन घेण्यात आले.

याप्रसंगी चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा कुंभार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी, बारटक्के व तहसिलदार हवाळ आदी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत मतदार संघातील सर्व घटकांना मतदानाचा हक्क बजाविता येण्यासाठी व मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी दिव्यांग सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

यामध्ये, दिव्यांगांना मतदान केंद्रापर्यत पोचविणे, केंद्राबाहेर रॅम्प तयार करणे, अपंगांना खुर्च्या उपलब्ध करुन देणे आदी सुविधा देण्यात येणार आहेत. तसेच, लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या हेतुने स्वीप व मतदान जनजागृती कक्षातर्फे चिंचवड विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या विविध शाळांमध्ये स्पर्धा भरविण्यात आल्या. यामध्ये, विद्यार्थ्यांकडून नागरिकांनी मतदान करणेबाबत विविध विषयांवर निबंध स्पर्धा व पत्रलेखन स्पर्धा घेऊन मतदान जनजागृती करण्यात आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.