आणखी 30 ठिकाणी राबवणार शेअरींग सायकल उपक्रम

पिंपरी – स्मार्ट सिटी योजने अंतर्गत शहरात आणखी 30 ठिकाणी सायकल शेअरिंग उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहीती स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे. सध्या पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने शहरातील पिंपळे गुरव आणि पिंपळे सौदागर येथे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यानंतर आता शहराच्या अन्य भागातही हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

कंपनीच्या प्रकल्प व्यवस्थापन विभागाच्या वतीने शहरातील 30 ठिकाणे निश्‍चित करण्यात आली असून लवकर या ठिकाणी ही सुविधा कार्यरत करण्यात येणार आहे. या सेवेसाठी मोबाईल ऍप विकसित करण्यात येत आहे. त्याचे काम पूर्ण होताच सेवा कार्यरत होणार आहे. सेवा सुरु करताना लोकसंख्येची घनता, सायकल लावण्यासाठी उपलब्ध जागा असे विविध निकष तपासण्यात येणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.