पिंपरी-पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये 285 शिक्षकांची कमरता असल्याने शिक्षण विभागाने कंत्राटी पद्धतीने भरतीसाठी जाहिरात दिली परंतु पालिकेला आवश्यक रिक्त पदे भरता आली नाहीत. जाहिरात दिल्यानंतर पालिकेला कंत्राटी पद्धतीने अध्यापन करण्यासाठी केवळ 238 शिक्षक उपलब्ध झाले असून विविध विषयांचे 47 शिक्षकांची अजूनही गरज आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांच्या एकूण 105 शाळा आहेत. या शाळांमध्ये 18 हजार 893 मुले तर 20 हजार 737 मुली शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्याना शिकविण्यासाठी 137 शिक्षक आणि 68 मुख्याध्यापक आहेत. मात्र, या शाळांमध्ये तब्बल 285 शिक्षकांची कमतरता होती. शाळा सुरू होऊन पाच महिने उलटल्यानंतर शिक्षकांची कमतरता भरुन काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. शिक्षण विभागाने नोव्हेंबरमध्ये कंत्राटी पध्दतीने शिक्षकांची भरती करण्याचे नियोजन केले. त्यासाठी जाहिरातीचे प्रकटीकरण करून इच्छुक शिक्षकांचे अर्ज मागविले. सुमारे तीन हजारांच्या आसपास अर्ज आले होते. मात्र, 238 शिक्षक पालिकेला उपलब्ध झाले आहेत. विविध विषयांचे 47 शिक्षक मिळाले नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.
ाबाबत शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत म्हणाले, पालिका शाळेतील 285 शिक्षकांची रिक्त पदे कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणार होती. मात्र, काही विषयांचे शिक्षक उलब्लध झाले नाहीत. त्यामुळे सध्या 238 शिक्षकांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.