पिंपरी – आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे. त्या दृष्टीने जनहिताची कामे करावीत, असे आवाहन मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी केले.
थेरगाव-डांगे चौक येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहरातील नवनिर्वचित विभाग अध्यक्ष उपविभाग अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष यांचा चिखले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
पिंपरी विधानसभा अध्यक्ष सुशील सोनकांबळे, उपविभाग अध्यक्ष निलेश कांबळे, महेंद्र निशिगंध, शिशिर महाबळेश्वकर, प्रभाग अध्यक्ष युवराज शिंदे, संजय मोरे, चिंचवड विधानसभा उपविभाग अध्यक्ष विवेक नेरलेकर, प्रभाग अध्यक्ष अनिल दहिभाते, संजय पंडित, राजेश येवते आदी पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
मनसे विद्यार्थी सेनेचे हेमंत डांगे, जनहित कक्ष अध्यक्ष राजू भालेराव उपस्थित होते.