पदोन्नतीमध्ये सत्ताधाऱ्यांचे उखळ पांढरे – मंगला कदम

पिंपरी – महापालिकेचे उपशहर अभियंता राजन पाटील यांच्या पदोन्नतीचा विषय विसंगत उपसूचनेद्वारे घाईघाईत मंजूर करण्यात आला. या पदोन्नतीमागे सत्ताधाऱ्यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप माजी महापौर मंगला कदम यांनी केला.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेनंतर पत्रकारांशी बोलताना कदम यांनी गंभीर आरोप केला.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, महापालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेसमोर शौचालयांना अनुदान देण्याचा विषय होता. या विषयाला जोडून पदोन्नतीचा विषय येऊच कसा शकतो. या विषयाला विसंगत उपसूचना देऊन उपशहर अभियंता राजन पाटील यांना शहर अभियंता या पदावर नियुक्‍ती करण्यास मान्यता देण्यात आली. घाई-घाईने हा विषय मंजूर करण्यामागे मोठा भ्रष्टाचार झाला आहे.

या उपसूचनेवर खुलासा मागितल्यानंतरही खुलासा करण्यात आला नाही. पक्षनेते एकनाथ पवार मनमानी पद्धतीने सभा चालविण्याचा प्रयत्न करतात. शिवीगाळ करणे, कोणालाही बोलू न देणे असे प्रकार सुरू आहेत. सभाशास्त्राचे सर्व नियम पायदळी तुडविण्याचा प्रयत्न केवळ त्यांनी केलेला भ्रष्टाचार लपविण्यासाठी सुरू असल्याचा आरोपही कदम यांनी यावेळी केला. आम्ही सत्तेत असताना उपसूचनेवर नेहमीचा खुलासा केला आहे. मात्र तुम्ही काय केले? असे उत्तर पवार नेहमीच राष्ट्रवादीच्या सदस्यांना देतात. यापुढे पवारांचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचेही त्या म्हणाल्या.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.