Pimpri-Chinchwad News | देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना पिंपरी -चिंचवडमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या स्वातंत्र्य दिन समारंभात एका दिव्यांग व्यक्तीने पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या शासकीय चारचाकी वाहनाच्या काचा फोडल्या आहेत.
दिव्यांग व्यक्तींवर महापालिकेकडून अन्याय होत असल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. पालिकेच्या मुख्य इमारतीत आयुक्त शेखर सिंह यांनी ध्वजारोहण केलं, त्यानंतर पालिकेने आयोजित केलेले काही कार्यक्रम सुरू होते. त्याचवेळी आयुक्त सिंह यांच्या मोटारीवर हल्ला करण्यात आला. Pimpri-Chinchwad News |
ध्वजारोहण सुरू असताना घडलेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला होता. अंध तरुणाच्या मागण्यांकडे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सातत्याने दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या शासकीय वाहनाची काच पडून आपला निषेध नोंदवला आहे. Pimpri-Chinchwad News |
रमाई योजनेअंतर्गत घराची मागणी करत आहे. मात्र ते अद्याप मिळाले नाही. तसेच त्या व्यक्तीच्या टपरीवर महापालिकेकडून अतिक्रमण कारवाई करण्यात आली आहे. घरकुलास निधी दिला जात नाही, सोबतच पालिकेच्या रुग्णालयात उपचाराची तत्परता दाखवली जात नाही, असे आरोप करत या अंध व्यक्तीने थेट महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून याबाबात आयुक्तांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. Pimpri-Chinchwad News |
हेही वाचा :
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असललेल्या हल्ल्यांवर मोहन भागवतांची प्रतिक्रिया समोर; म्हणाले…