पिंपरी-चिंचवड लॉकडाऊन हवे की नको?

करोना विषाणूची चैन तोडायची असेल तर त्यावर लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय आहे. लॉकडाऊनमुळे उद्योग व्यवसायांवर परिणाम होणार आहे हे अगदी खरे आहे. मात्र लोकांना मृत्यूच्या दाढेत लोटणे योग्य नाही. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन करावेच लागेल. शहरात सगळीकडे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्याचा परिणाम शहरातील रुग्णसंख्या वाढण्यावर होत आहे. लॉकडाऊनचा निर्णय झाला तर ही गर्दी आटोक्‍याच आणून करोनाची साखळी तोडण्यास मदत होईल.
– माई ढोरे, महापौर, पिंपरी-चिंचवड महापालिका


शहरातील करोनाची परिस्थिती बिकट आहे यावर दुमत नाही. दररोज 1800 पेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत. मात्र, लॉकडाऊन केल्याने हातावर पोट असलेल्या मजुरांचे जगणे मुश्‍किल होईल. अनेकांच्या नोकऱ्या यामध्ये जातील. त्यामुळे लॉकडाऊन करण्यापेक्षा निर्बंध कडक करणे चांगले आहे. नागरिकांवर जास्तीत जास्त बंधने घालून बाहेर गर्दी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. लॉकडाऊनमुळे अर्थिक मंदी येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे निर्बंध कडक करा, मात्र लॉकडाऊन नको.
– नामदेव ढाके, सत्तारुढ पक्षनेते.


उद्योगनगरीमध्ये दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मात्र लॉकडाऊन हा त्यावरील पर्याय नक्कीच नाही. सरकार आनंदाने लॉकडाऊन करत नाही. त्यामुळे लॉकडाऊनपेक्षा नागरिकांनीच सहकार्य करणे अपेक्षित आहे. नियमांचे पालन केले तरी बऱ्याच अंशी आपण करोनाची साखळी तोडण्यामध्ये यशस्वी होऊ. आर्थिक कणा आधीच मोडला आहे. त्यामुळे नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.
– योगेश बहल, नगरसेवक, राष्ट्रवादी कॉंग्रेस.


उद्योगनगरीमध्ये दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मात्र लॉकडाऊन हा त्यावरील पर्याय नक्कीच नाही. सरकार आनंदाने लॉकडाऊन करत नाही. त्यामुळे लॉकडाऊनपेक्षा नागरिकांनीच सहकार्य करणे अपेक्षित आहे. नियमांचे पालन केले तरी बऱ्याच अंशी आपण करोनाची साखळी तोडण्यामध्ये यशस्वी होऊ. आर्थिक कणा आधीच मोडला आहे. त्यामुळे नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.
– योगेश बहल, नगरसेवक, राष्ट्रवादी कॉंग्रेस.


मागच्या आठवड्यामध्ये पालकमंत्र्यांनी जाहीर केले होते की, नागरिकांनी नियम पाळले नाही तर लॉकडाऊन करावा लागेल. करोनाची परिस्थिती गंभीर होत आहे. लॉकडाऊन करायचा की नाही हा निर्णय पालकमंत्री घेतील. मात्र ते जो काही निर्णय घेतील हा नक्कीच जनतेच्या हिताचा असेल.
– ऍड. सचिन भोसले, शहराध्यक्ष, शिवसेना.


शहरात करोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यासोबतच मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. शहरातील सर्व रुग्णालये फुल्ल झाली आहेत. याची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन कऱणे आवश्‍यक आहे. मात्र लॉकडाऊन करण्यापूर्वी हातावर पोट असलेल्या नागरिकांची सोय करणे आवश्‍यक आहे. सर्वसामान्य नागरिकांचे हाल होता कामा नये.
– सचिन चिखले, शहराध्यक्ष, मनसे.


सार्वजनिक ठिकाणी कडक निर्बंध लावणे आवश्‍यक आहे. लॉकडाऊन केला तर हातावर पोट असणाऱ्यांची उपासमार होईल. त्याऐवजी अन्य उपाययोजनांवर भर द्यावा. सर्वसामान्य नागरिकांना निर्बंधामधून थोडीसी सूट दिली, तर त्यांचे कामकाज सुरू राहील.
– सचिन साठे, माजी शहराध्यक्ष, कॉंग्रेस.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.