पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पाच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी गुरुवारी (दि. 14) रात्री याबाबतचे आदेश दिले. अचानक झालेल्या या बदल्यांच्या मागे प्रशासकीय कारण देण्यात आले आहे.
कोठून कोठे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर – वाकड ते हिंजवडी पोलीस ठाणे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने – शिरगाव पोलीस चौकी ते वाकड पोलीस ठाणे
वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण सावंत – हिंजवडी ते एमओबी/ पीसीबी
पोलीस निरीक्षक मनोज खंडाळे – नियंत्रण कक्ष ते एमओबी, पीसीबी मनोज
पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ – आर्थिक गुन्हे शाखा ते शिरगाव पोलीस चौकी