पिंपरी-चिंचवड : आयुक्तांच्या नामफलकावर फेकली शाई, भाजप नगरसेविका पोलिसांच्या ताब्यात

वॉर्डात सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामावरून आंदोलन

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या कक्षात भाजपच्या नगरसेविका आशा शेंडगे यांनी जोरदार आंदोलन केले. त्यांच्यासोबत काही महिला कार्यकर्त्याही सहभागी होत्या.

कासारवाडी याठिकाणी भर पावसाळ्यात आयुक्तांनी खोदकाम सुरू केल्याने त्यांनी आंदोलनाचा पवित्रा उचलला.

यावेळी आयुक्तांच्या नामफलकावर शाई फेकत त्यांनी निषेध व्यक्त केला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत महिला कार्यकर्त्यांसह नगरसेविका आशा शेंडगे यांना ताब्यात घेतले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.