पिंपरी – सलग दुसऱ्या दिवशी करोनामुळे नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आतापर्यंतच्या करोना मृत्यूंची संख्या 2327 इतकी झाली आहे. तसेच गुरुवारी आणखी 165 जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 259 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
गुरुवारी सायंकाळी हाती आलेल्या अहवालानुसार गेल्या 24 तासांमध्ये 165 जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे आतापर्यंतच्या करोनाबाधितांचा एकूण आकडा 92939 इतका झाला आहे. त्यापैकी 89231 जणांनी करोनावर मात केली आहे.
गेल्या 24 तासांत 9 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यात 7 रुग्ण हे शहरातील होते. तर 2 रुग्ण शहराबाहेरील रहिवासी असून त्यांच्यावर शहरात उपचार सुरु होते. आतपर्यंत शहरातील 1649 आणि शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेणाऱ्या 678 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
गुरुवारी 3394 संशयित करोना चाचणीसाठी दाखल झाले आहेत. अद्याप 1320 जणांचे अहवाल प्रतिक्षेतील आहेत. सध्या रुग्णालयात 811 आणि 1248 करोनाबाधित रुग्ण घरी उपचार घेत आहे.