पिंपरी – शहरात रविवारी (दि. 2) ओमायक्रॉनचे 5 नवीन रुग्ण आढळले. त्यामध्ये 2 पुरुष आणि 3 महिला रुग्णांचा समावेश आहे. हे रुग्ण रॅन्डम तपासणीत ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. संबंधित रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्याची कार्यवाही सुरू आहे.
परदेशातून आलेल्या प्रवाशांपैकी 41 रुग्ण करोनाबाधित आढळले. त्यातील संपर्कात आलेल्या 28 रुग्णांना करोनाची लागण झाली. बाधित 41 रुग्णांमध्ये ओमायक्रॉन बाधित 14 रुग्ण आढळले. तर, संपर्कात आल्यानंतर बाधित झालेल्या 28 रुग्णांपैकी 11 रुग्ण हे ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. रॅन्डम तपासणीत 8 रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे.
आत्तापर्यंत 16 रुग्ण हे ओमायक्रॉन मुक्त झाले आहेत. एकूण 77 करोना बाधित रुग्णांपैकी 48 रुग्णांची पुन्हा दहाव्या दिवशी करोना चाचणी करण्यात आली. त्यांचा करोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. या रुग्णांना घरी सोडून गृहविलगीकरणात ठेवले आहे.