पिंपळे सौदागर येथील मोबाईल कंपनीचे शोरुम फोडले

पिंपरी -पिंपळे सौदागर येथील गोविंद चौकात असलेले आयडीआय या मोबाईल कंपनीचे शोरुम फोडून आतील 22 हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले. ही घटना 10 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याबाबत प्रदिप जगन्नाथ जाधव (वय-27) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रदिप हे त्यांचे आयडीआय कंपनीचे शोरुम 10 मे रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बंद करुन घरील गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शोरुमचे कुलूप उचकटून आतमध्ये प्रवेश केला व शोरुममधील रोख 22 हजार रुपये रोख व जुना वापरात असलेला मोबाईल चोरुन नेला. याबाबत अधिक तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.